
Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपालांचा राजीनामा मंजूर केल्याबद्दल कोथरूडमध्ये पेढे वाटप
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा केंद्र सरकारने मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड येथे नागरिकांना पेढे वाटून तसेच फटाके आणि हलगी वाजवून आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान केला होता त्याच वेळी त्यांना पदावरून हटायला हवे होते, असे कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे,कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर,मनोज पाचपुते,ज्योती सूर्यवंशी,समीर उत्तरकर, स्वप्नील जोशी,रोहन पायगुडे,केतन ओरसे,अमोल गायकवाड,अमित खाणेकर,शेखर तांबे,मधुकर भगत, अजू शेख,आरव दिघे,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.