मोबाईलवर बोलणाऱ्या पीएमपी चालकांना दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

औंध- रावेत, सांगवी- किवळे, पुणे- मुंबई रस्ता, आळंदी रस्ता आदी मार्गांवर ही कारवाई करण्यात आली. पीएमपीने बीआरटी मार्गांवर नियुक्त केलेल्या फिल्ड ऑफिसरमार्फत ही कारवाई झाली आहे. मोबाईलवर बोलत बस चालविताना एक चालक पाच दिवसांत दोन वेळा सापडला. त्याला सुमारे दोन हजार रुपये दंड केला. तसेच पीएमपीच्या सर्व आगारांमध्ये चालकांनी मोबाइलवर न बोलता बस चालवावी, या बाबतचे आदेश दिले आहेत.

पुणे - मोबाईलवर बोलत बस चालविणाऱ्या पीएमपीच्या १४ चालकांना प्रशासनाने प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेल्या पाच दिवसांत ही कारवाई झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

औंध- रावेत, सांगवी- किवळे, पुणे- मुंबई रस्ता, आळंदी रस्ता आदी मार्गांवर ही कारवाई करण्यात आली. पीएमपीने बीआरटी मार्गांवर नियुक्त केलेल्या फिल्ड ऑफिसरमार्फत ही कारवाई झाली आहे. मोबाईलवर बोलत बस चालविताना एक चालक पाच दिवसांत दोन वेळा सापडला. त्याला सुमारे दोन हजार रुपये दंड केला. तसेच पीएमपीच्या सर्व आगारांमध्ये चालकांनी मोबाइलवर न बोलता बस चालवावी, या बाबतचे आदेश दिले आहेत. मोबाइलवर बोलत चालक बस चालवीत तिसऱ्यांदा सापडल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Penalties for PMP drivers who speak on mobile