
पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल वाहनावर आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम न्यायालयात, लोकअदालतीमध्ये भरली तरी देखील पोलिसांच्या ‘ॲप’वर दंडाची रक्कम कायम राहत असल्याचा धक्कादायक अनुभव वाहनचालकांना येत आहे. न्यायालयात दंड गोळा करणारे पोलिस कर्मचारी आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेतील कर्मचारी, यांच्या विसंवादामुळे हा प्रकार घडत आहे.