पेंटरने लावला 'चुना'; नेकलेस चोरून मणप्पुरममध्ये गोल्ड लोन

penter theft necklace and took Gold loan in Manappuram in pimpri
penter theft necklace and took Gold loan in Manappuram in pimpri

किरकटवाडी(पुणे) : घराला रंग देण्यासाठी आलेल्या पेंटरने सुमारे तीन तोळे वजनाचे नेकलेस लंपास करून घर मालकाला ऐन सणासुदीत 'चुना' लावण्याचा प्रकार किरकटवाडी (ता. हवेली) येथे उघडकीस आला आहे. चोरलेल्या सोन्यावर मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शुक्रवार पेठ शाखेतून 50 हजार रुपयांचे सोने तारण कर्जही घेतल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगेश चंद्रकांत धुमक(वय 30) आणि निलेश चंद्रकांत धुमक (वय 25) (दोघेही रा.जनता वसाहत,गल्ली क्र. 67) या पेंटिंग चे काम करणाऱ्या दोघा भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांनीही चोरीची कबुली दिली आहे.ताब्यात घेण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर इतर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान दोघेही आरोपी किरकटवाडी येथील आकाश करंजावणे यांच्या घराचे रंग काम करत होते. त्या दरम्यान दोघा आरोपींनी पाळत ठेवून घरातील सोन्याच्या नेकलेस वर डल्ला मारला. 12 ऑक्टोबर रोजी घरातील सोने चोरीला गेले असल्याचे लक्षात आल्यानंतर जयश्री आकाश करंजावणे यांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर रंगकाम करण्यासाठी आलेल्या मंगेश आणि निलेश धुमक यांची नावे समोर आली. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनीही चोरीची कबुली दिली. विशेष म्हणजे चोरून नेलेल्या नेकलेस वर मणप्पुरम फायनान्स कंपनी मधून 50 हजार रुपयांचे सोनेतारण कर्जही घेतल्याचे दोघांनी सांगितले. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजित शिंदे, पोलीस हवालदार संजय शेंडगे, पोलीस नाईक दिनेश कोळेकर, रामदास बाबर, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र मुंढे यांनी शिताफीने तपास करत हा चोरीचा गुन्हा उघड केला. 

सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी

सख्या भावांबरोबर चोरीत आईचाही सहभाग......
चोरी केलेल्या नेकलेसवर आईच्या नावाने सोनेतारण कर्ज घेण्यात आलेले आहे. पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर मंगेश आणि निलेश धुमक ची आई उडवाउडवीची उत्तरे देत होती; मात्र त्यांच्या जनता वसाहत येथील घरातून सोनेतारण कर्जाची पावती हस्तगत केल्यानंतर आईचा सहभाग स्पष्ट झाला.

मणप्पुरमचीही होणार चौकशी.....
सोनेतारण कर्जासाठी आणण्यात आलेल्या सोन्याची योग्य खातरजमा न करता व खरेदीच्या पावतीची पडताळणी न करता सोने ठेऊन घेऊन कर्ज दिल्याने मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शुक्रवार पेठ शाखेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्याकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com