अशी ही बनवा बनवी; 'को-मॉर्बिड' प्रमाणपत्रासाठी डॉक्टरांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 March 2021

सहव्याधी प्रमाणपत्राचे समर्थन करणारे वैद्यकीय पुरावे, प्रमाणपत्रासोबत जोडण्याचे बंधन घातले पाहिजे. कारण अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविण्याची स्पर्धाच जणू सध्या शहरात सुरू असल्याचे दिसते, असे निरीक्षणही वेगवेगळ्या डॉक्टरांनी नोंदविले आहे.

पुणे : सहव्याधी (को-मॉर्बिड) असल्याशिवाय ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस मिळत नाही. अशा परिस्थितीत सहव्याधी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या वयोगटातील तंदुरुस्त नागरिकांची शहरातील अनेक क्लिनिकवर गर्दी होऊ लागली आहे. रोजच्या रोज होणाऱ्या चौकशीमुळे डॉक्टरही त्रस्त झाले आहेत.

असे आहे लसीकरण
-देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.
-साठी ओलांडलेल्या आणि ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधींना लस देण्यात येत आहे.
-सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुविधा

सहव्याधी म्हणजे काय?
- एखाद्या व्यक्तीला काही आजार असणे (उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब आदी)
- असे आजार असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना या टप्प्यात लस देण्यात येते
- यासाठी संबंधित व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
- अशा रुग्णांबरोबरच तंदुरुस्त नागरिकांकडूनही प्रमाणपत्र मिळविण्याची धडपड सुरू
- यासाठी रोज १० ते १५ फोन येत असल्याचा अनेक डॉक्टरांचा अनुभव

 

‘को-मॉर्बिड कंडिशन’ नसताना प्रमाणपत्र मागणाऱ्यांचे प्रमाण वाढणे हे योग्य नाही. लसीकरणाचा उद्देश चांगला आहे. रुग्णांच्या अशा मागणीमुळे मोहिमेचा मूळ उद्देश सफल होणार नाही.
-डॉ.अविनाश भोंडवे, माज अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, राज्य शाखा

 

शहरात स्पर्धा सुरू
सहव्याधी प्रमाणपत्राचे समर्थन करणारे वैद्यकीय पुरावे, प्रमाणपत्रासोबत जोडण्याचे बंधन घातले पाहिजे. कारण अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविण्याची स्पर्धाच जणू सध्या शहरात सुरू असल्याचे दिसते, असे निरीक्षणही वेगवेगळ्या डॉक्टरांनी नोंदविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people asking doctor for a comorbidity certificate to get the vaccine