पुणे : सिंहगड रस्ता परिसरात मद्य विक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांची गर्दी

people gathered on Sinhagad road area for liquor in Pune.jpg
people gathered on Sinhagad road area for liquor in Pune.jpg

सिंहगड रस्ता(पुणे) : सिंहगड रस्ता परिसरात लॉकडाउन शिथिल करण्यात आले मात्र नियमात स्पष्टता नसल्याने संभ्रमावस्था  निर्माण होऊन सावळागोंधळ उडाला.
सिंहगड रस्ता परिसरात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु नियमात स्पष्टता केली नव्हती, त्यामुळे रस्त्यावर एकच गर्दी सुरू झाली. तसेच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर किमान अर्धा किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, मद्यविक्री साठी दुकाने सुरू केली नव्हती. दरम्यान अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांना सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असा कालावधी असताना देखील पोलिसांच्या आदेशानुसार दुपारी बारा वाजतात सर्व दुकाने बंद करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सगळ्याचा परिणाम म्हणून सिंहगड रस्ता भागात वाहनांची गर्दी वाढली तसेच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.राज्य शासन महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यात एकवाक्यता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत लवकरच संपूर्ण माहिती देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत नागरिक तसेच दुकानदारांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.

''आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी दहा ते सायंकाळी सहा दुकान सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती परंतू,  बारा वाजता दुकान बंद करण्याचे आदेश पोलिसांकडून आल्याने दुकान बंद केले आहे. याबाबत लवकरात लवकर स्पष्टता व्हावी.''
- अविनाश खंडारे (दुकानदार)

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; शहराचा 20 टक्के भाग आता होणार खुला


''दुकाने सुरू होणार म्हणून सांगण्यात आले परंतु नेमकी कोणती आणि कशी दुकाने सुरू होणार याच्यात स्पष्टता नसल्याने गोंधळ झाला. तसेच रस्त्यावर गर्दी वाढली सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले नाही.''
 - अजिंक्य कुलकर्णी (नागरिक)


पेट्रोल पंप सुरु ठेवण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पत्र; दुपार पर्यंत निर्णय येणार

''सोशल डिस्टन सिंग चे नियम पाळले जात नसल्याने भविष्यात कुठला धोका उद्भवल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? महापालिकेने नियमावलीची स्पष्टता व्यक्त करावी.''
- चैतन्य पुरंदरे (अध्यक्ष, संघर्ष सोशल फाउंडेशन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com