तुम्हाला माहित आहे का? पुण्यात दारु मिळविण्यासाठी मिळताहेत पैसै

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

दारुच्या दुकांनाबाहेर रांगेत उभे राहण्यासाठी ३०० ते ५०० रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्यांचे रोजगार सध्या बंद आहेत अशांना हा लोकांना हा तात्पुरता रोजगार उपयोगी ठरत आहे.​

पुणे : म्हणतात, पुणे तिथे काय उणे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात दारुविक्री सुरु झाली आहे. सध्या प्रत्येक दुकानाच्या बाहेर लोकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. आता याच दारुच्या दुकानांबाहेरील लांब रांगा काहींसाठी रोजगार ठरत आहे. पुण्यातल्या लोकांनी सध्या हा नविन रोजगार सुरु केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या पुण्यातील प्रत्येक दुकांनाबाहेर लांबच्या लाबं रांग लागेल्या आहेत. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून, भर उन्हात लोक तासन तास रांगेमध्ये उभारलेले दिसतात. पण काहींना या त्रासापासून वाचण्यासाठी काहींनी शक्कल लढविली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांना रांगेत उभे राहायचे नाही असे लोक त्यांच्या जागी दुसऱ्याला उभे करतात त्यांना मोबाईल नंबर देऊन स्वत: लांब सावली जाऊन थांबतात किंवा घरी जातात.  त्यांचा नंबर आला की रांगेत थांबलेली व्यक्ती पुन्हा फोन करुन कळवते. मग रांगेत तासभर उभे राहिलेल्या व्यक्तीची जागा ती व्यक्ती घेते आणि दारु खरेदी करते. काही जण तर रांगेत उभी राहण्याची तसद्दी देखील घेत नाही, रांगेत उभे राहिलेल्या व्यक्तीला फोनवरुनच दारुची आर्डर देतात. रांगेत उभी राहीलेली व्यक्ती दारु खरेदी करुन संबधित व्यक्तीला देते.  

विनापरवाना भाजीपाला घेऊन गेले होते चौघे; मग झालं असं काही...

दारुच्या दुकांनाबाहेर रांगेत उभे राहण्यासाठी ३०० ते ५०० रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्यांचे रोजगार सध्या बंद आहेत अशांना हा लोकांना हा तात्पुरता रोजगार उपयोगी ठरत आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People get paid to stand in the liquor queue in Pune