जलसंधारणाच्या कामासाठी लोकसहभागाची चळवळ होणे गरजेचे - सुनंदा पवार

संतोष आटोळे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : दुष्काळाशी सामना करायचा असेल तर प्रत्येकाने पाऊसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवले पाहिजे. तरच पाणी पातळी वाढेल. तसेच दुष्काळ कायमस्वरुपी हटविण्यासाठी जलसंधारण कामासाठी लोकसहभागाची चळवळ होणे गरजेचे असे प्रतिपादन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले.

सिध्देश्वर निंबोडी (ता.बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, बारामती अँग्रो  यांच्या वतीने नाला खोलीकरण, मातीनाल्यातील गाळ काढणे कामाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी पवार बोलत होत्या. 

पाणी फाउंडेशन तर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सिद्धेश्वर निंबोडी या गावाने भाग घेतला आहे.या गावात श्रमदान मोठ्या प्रमाणात चालू आहे. सीसीटी बंधारे, दगडी पिचिंग आशा प्रकारची कामे चालू आहेत. तर इतर मोठी कामे यामध्ये माती नाला तयार करणे, जुन्या तलावांमधील गाळ काढणे या कामांसाठी मशिनची आवश्यकता होती. यासाठी ट्रस्ट व अॅग्रो यांच्या वतीने कामासाठी मशीन उपलब्ध करुण देण्यात आले आहे. व सकाळ रिलीफ फंडातुन इंधन खर्च देण्यात येणार आहे.     

यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाल्या,  गावातील प्रत्येकाने कामाची गुणवत्ता पाहणे, कमी वेळात जास्त काम कसे होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.याप्रसंगी श्रमदानात सहभागी ग्रामस्थांसह,  पाणी फाऊंडेशनचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गावातील प्रशिक्षण घेतलेले सदस्य, शाळेतील मुले उपस्थित होते.

Web Title: People participation should be a movement for water conservation