पुणेकरांनो, घरातच बसा...सूर्य ओकतोय आग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

पुणेकरांनो, कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातच थाबंणे गरजेचे आहे. आता साक्षात सूर्यनारायणही तुम्हाला तसा आदेश देत आहे. कारण,

पुणे : पुणेकरांनो, कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातच थाबंणे गरजेचे आहे. आता साक्षात सूर्यनारायणही तुम्हाला तसा आदेश देत आहे. कारण, गेल्या चार दिवसांपासून पुण्याच्या तापमान पाऱ्याचा प्रवास वाढता वाढता वाढे, असाच आहे. तापमानाने काल (रविवारी) थेट चाळीशी ओलांडली. आजही दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारा 38 अंश सेल्सिअसवर पोचला होता. त्यातून "घरातच रहा, सुरक्षित रहा' असा जणू सल्लाच दिला आहे. 

एेकलंत का? आळंदीत लावले जात आहे चोरून लग्न

पुण्यासह राज्यातील सरासरी तापमानात रविवारी लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. नागपूर येथे सर्वाधिक 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे शहरातही पाऱ्याने रविवारी चाळिशी ओलांडली. रविवारी दिवसभर आकाश निरभ्र व हवामान कोरडे होते. सोमवारी दुपारीही एक वाजण्याच्या सुमारास पारा 38 अंश सेल्सिअसवर पोचला होता. 

पुण्यावरून या आठ शहरांसाठी सुरू झाली विमानसेवा

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत तापमानात मोठी वाढ झाली होती. पुढील दोन दिवस तापमानात किंचितशी वाढ होणार असून, आकाश मुख्यत्वे निरभ्र आणि हवामान कोरडे असेल. आज विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे शहर आणि परिसरातील तापमानात शुक्रवारी (ता. 22 ) लक्षणीय वाढ पहायला मिळाली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सरासरी तापमान 37.8 अंश सेल्सिअस होते. रविवारी हेच तापमान 41 अंश सेल्सिअस झालेले पाहायला मिळालं. लोहगाव येथे सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस; तर पाषाण येथे 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजही शहरातील तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचितशी वाढ हवामान विभागाने वर्तवली आहे. 

देशातील प्रमुख शहरांतील आजचे तापमान (अशं सेल्सिअसमध्ये) 
मुंबई : 33 
बेंगळूरू : 29.6 
चेन्नई : 36.4 
हैद्राबाद : 38 
कोलकता : 31.8 
अहमदाबाद : 37.4 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People of Pune, stay at home, the sun is burning