
सिंहगड रस्ता : पुण्यात बुधवारी (ता.25) रात्री मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. ऑफिसमधून घरी जाणारे सर्व नागरिक या मुसळधार पावसामुळे अडकून पडले होते. हळूहळू पाऊस वाढत होता. तसतसा रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहदेखील वाढत चालला होता. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविण्यात अडथळा निर्माण होत होता.
सिंहगड रस्ता भागाच्या हिंगणे परिसरातील खोराड वस्तीकडून येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. कोरडे वस्ती पुढे असलेल्या तळजाईच्या डोंगरावरून आणि आजूबाजूच्या परिसरातून हे पाणी येत होते. या पाण्याला इतका वेग होता की, नागरिकांना रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले होते.
तसेच कोरड वस्तीतील रस्त्यांचे डांबर या पावसाच्या पाण्याने उखडून गेले आहे. तसेच सिमेंट काँक्रिटचे रस्तेदेखील वाहून गेले आहेत. अशातच एक दुचाकीस्वार आपली गाडी घेऊन पाण्याच्या प्रवाहातून जात होता. मात्र, पाण्याच्या वेगामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो त्या पाण्यात पडला.
किमान पंधरा ते वीस फूट तो दुचाकीस्वार आपल्या गाडीसोबत वाहत गेला. मात्र, तिथेच असलेल्या नागरिकांनी एवढ्या पाण्याच्या प्रवाहातून कसेबसे त्याला धावत जाऊन वाचवले. त्यानंतर त्या भागातून कोणतीही गाडी जाऊ दिली नाही. याची खबरदारी घेत भर पावसात तेथे त्यांनी जणू पहारा दिला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
Pune Rains आणखी महत्त्वाच्या बातम्या :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.