esakal | पुणे : कोरोनामुळे मोटार खरेदी होती थंड; पण आता...
sakal

बोलून बातमी शोधा

Four-Wheeler

कोरोनाचा लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे वाहन खरेदीसाठी आता ग्राहकांची पावले बाजारपेठेत वळू लागली आहेत.

पुणे : कोरोनामुळे मोटार खरेदी होती थंड; पण आता...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे वाहन खरेदीसाठी आता ग्राहकांची पावले बाजारपेठेत वळू लागली आहेत. सध्या मोटार खरेदीची क्रेझ आली असून, त्यासाठी शहरातील विविध शोरूम सज्ज झाली आहेत. वाहनांसाठीची पुरवठा साखळी सुरळीत होऊ लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे नागरिक स्वतःच्या वाहनांवर भर देत आहेत. तसेच स्वतःच्या मोटारीतून प्रवास करणे त्यांना सुरक्षित वाटू लागले आहे. त्याचे पडसाद ऑटोोमोबाईल क्षेत्रावर उमटत आहेत असल्याचे दिसून आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडेही (आरटीओ) 18 मे ते 30 जून दरम्यान सुमारे 6500 वाहनांची नोंदणी झाली. त्यात 2 हजारपेक्षा जास्त मोटारींचे प्रमाण आहे. त्यामुळे चारचाकीची मागणी सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी वित्त पुरवठ्याचे विविध पर्यायही सहजपणे उपलब्ध आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या बाजारपेठेत पाच लाखांपासून मोटारी उपलब्ध आहेत. ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार मोटारी घेण्यासाठी बहुविध पर्याय आहेत. तसेच सेकंड हॅन्ड गाड्या विकत घेण्याचेही प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण या क्षेत्रातील व्यावसायिकांनी नोंदविले. दुचाकींच्या तुलनेत ग्राहकांना मोटारी सोयीच्या पडत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षक डिस्काउंटही ऑफर केले आहेत. मात्र, कोरोनाचे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांना घराबाहेर पडण्यावर मर्यादा येत आहेत. त्याचा फटका बाजारपेठेला बसत आहे. पूर्वीच्या तुलनेत बाजारपेठ सुमारे 40 टक्क्यांनी रिकव्हर झाल्याचेही निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदविले आहे.   

 =================

मोटार खरेदी ही आता लक्झरी राहिलेली नसून ग्राहकांची गरज झाली आहे. कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीएेवजी ग्राहक आता स्वतःच्या वाहनावर अवलंबून राहू लागला आहे. त्यामुळे नवी, जुनी गाडी घेण्याकडे त्यांचा कल दिसू लागला आहे. काही प्रमाणात व्यवसाय नक्कीच रिकव्हर होऊ लागला आहे. 

- राजेंद्र कोठारी, कार्यकारी संचालक, कोठारी हुंदाई

==================

नवी मोटार घेण्यासाठी ग्राहकांची इन्क्वायरी जूनमध्ये वाढल्याचे दिसून आले आहे. जुलैमध्ये आणखी त्यात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. मोटार वितरणाची सप्लाय चेन सुरळीत आहे. ग्राहक आता स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्यावर भर देत आहे. त्यामुळे मागणी वाढू शकते. 

- देवेन भंडारी, संचालक, बी. यू. भंडारी मोटर्स

=================

वाहनांच्या सुट्या भागांची बाजारपेठ सकारात्मक दिशेच्या सरकत आहे. पूर्वीच्या तुलनेत सुमारे 40 टक्के व्यवसाय रिकव्हर झाला आहे. दिल्ली, गुडगाव, पंजाबमधून सुट्या भागांच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात मर्यादा आहेत. परंतु, बाजारात आता ग्राहक येऊ लागले आहेत, ही समाधानाची बाब आहे.

- भूपिंदरसिंग बिंद्रा, माजी सचिव, पुणे ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन.

loading image
go to top