उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांचा बारामतीत होणार 'असा' सत्कार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 January 2020

- उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर आता अजित पवार यांच्या नागरी सत्कारासाठी बारामती सज्ज.

बारामती : उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर आता अजित पवार यांच्या नागरी सत्कारासाठी बारामती सज्ज झाली आहे. त्यानुसार त्यांच्या मिरवणुकीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर शारदा प्रांगणात अजित पवार यांचा सपत्नीक सत्कार उद्या (शुक्रवार) करण्यात येणार आहे. त्यापूर्वी दुपारी चार वाजता कसब्यातून जीपमधून त्यांची मिरवणूक काढली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संस्था व व्यक्तींचा सत्कार स्वीकारुन अजित पवार यांचा संध्याकाळी साडेपाच वाजता शारदा प्रांगणात स्मृतीचिन्ह देऊन सत्कार होणार आहे. येथील अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या मंडळाची स्थापना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यामुळे पवार कुटुंबियांचे या मंडळावर विशेष प्रेम आहे.  

पुणे : डिंगोरे येथे रोजच होते बिबट्याचे दर्शन (व्हिडिओ)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहभाग असलेले सरकार सत्तेवर आल्याने तसेच अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने सर्वांपेक्षा वेगळा सत्कार करण्याची मंडळातील सदस्यांची इच्छा होती. चर्चेअंती सदस्यांनी आपापसात वर्गणी गोळा करून मिरवणूक व सत्कार समारंभावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन केले.  त्यासाठी आवश्यक असणारी जिल्हा प्रशासनाची परवानगीही घेण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples of Baramati will felicitate to Ajit Pawar on 10th January