esakal | तीन महिन्यांचे 'ईएमआय' स्थगित होणार, पण... 
sakal

बोलून बातमी शोधा

तीन महिन्यांचे 'ईएमआय' स्थगित होणार, पण... 

आरबीआयने बँकांना ईएमआय स्थगित करण्याचा सल्ला दिला असला तरी त्यानुसार बॅंका आपले धोरण जाहीर करतील. परंतु, बहुतांश ग्राहकांना 'ईएमआय'चे मेसेज आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. 

तीन महिन्यांचे 'ईएमआय' स्थगित होणार, पण... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सर्व बँकांना ग्राहकांचे तीन महिन्यांचे 'ईएमआय' स्थगित करण्याची सूचना केली होती. . मात्र तरीही काही बँकांकडून ग्राहकांना 'ईएमआय' भरण्याचे मेसेज येत असल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

'कोरोना'मुळे देशभरात 'लॉकडाउन' करण्यात आले आहे. परिणामी बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत. यावर शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना दिलासा देत तीन महिन्यांसाठी गृहकर्ज, वाहन कर्जाचे हप्ते (ईएमआय) स्थगित करण्याची सूचना केली आहे. त्यावर बँकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत काम सुरू आहे केले आहे. 

आरबीआयने बँकांना ईएमआय स्थगित करण्याचा सल्ला दिला असला तरी त्यानुसार बॅंका आपले धोरण जाहीर करतील. परंतु, बहुतांश ग्राहकांना 'ईएमआय'चे मेसेज आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. 

आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार काही बँकांनी काम सुरू केले असून सॉफ्टवेअरमध्ये त्यानुसार बदल केले जातील. ग्राहकांना येणारे मेसेज सॉफ्टवेअर जनरेटेड असल्याने ते ग्राहकांना मिळत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. मात्र बँकांकडून लवकरच बदल करण्यात येत असल्याची माहिती एका सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तसेच बँकांकडून मार्च ते मे दरम्यान 'ईएमआय' स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे सध्या ग्राहकांना मिळणारे मेसेज सॉफ्टवेअर जनरेटेड असल्याने ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले. 
-- 
 

loading image