पुणे : अजित पवार, भरणे यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर लाडू वाटून जल्लोष

डॉ. संदेश शहा
Thursday, 9 January 2020

राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार तसेच जलसंधारण राज्यमंत्री म्हणून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शपथविधी नुकताच पार पडला.

इंदापूर : राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार तसेच जलसंधारण राज्यमंत्री म्हणून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शपथविधी नुकताच पार पडला. त्यानंतर आता इंदापूर तालुक्यातील 30 हजार विद्यार्थ्यांना बुंदीचे लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात बारामती येथील साईराज केटरचे प्रमुख धर्मेंद्र पाटील यांनी तीस हजार लाडू आपल्या सहकाऱ्यांसोबत बनवले. विद्या प्रतिष्ठानचे इंदापूर समन्वयक वर्धमान शहा यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा समर्थ व्यायाम मंडळ संचलित मूकबधीर निवासी शाळेचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूकबधीर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना लाडू वाटप सुरू करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, आश्रमशाळा तसेच रयत शिक्षण संस्थेच्या तीस हजार विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले.

विद्या प्रतिष्ठानचे प्राध्यापक अमोल जगताप व हर्षवर्धन लोंढे, जमीर शेख व ज्योतिरं सूर्यवंशी यांनी लाडूचे वाटप केले. यासंदर्भात धर्मेंद्र पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होणार असल्याने आपण लाडू वाटप केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples of Indapur Taluka celebrated after Ajit Pawar and dattatray bharne take oath as Minister ship