
मंचर : 'सकाळ'च्या वर्धापन दिनानिमित्त खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील नाट्यरसिकांसाठी आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या नाट्यमहोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी (ता. 10) होत आहे.
मंचर- एकलहरे (ता. आंबेगाव) येथील अथर्व मंगल कार्यालयात हा महोत्सव होत आहे. तिकीट विक्रीला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मराठीतील गाजणारी तीन नवीन नाटके पाहण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळणार आहे.
सत्यशीलदादा शेरकर युवा मंच, कोमल प्रॉपर्टीज, शरद सहकारी बॅंक, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. व कपासी, संपूर्ण मेन्स वेअर मंचर यांच्या सहकार्याने या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे.
उद्या (ता. 10) प्रशांत दामले व कविता मेढेकर यांचे "एका लग्नाची पुढची गोष्ट', शनिवारी (ता. 11) संजय खापरे, पूर्वा फडके यांचे "डोन्ट वरी हो जायेगा', रविवारी (ता. 12) संकर्षण कऱ्हाडे व भक्ती देसाई यांचे "तू म्हणशील तसं' ही नाटके होणार आहेत. महोत्सवाच्या तीनही दिवसांसाठीची तसेच प्रत्येक नाट्यप्रयोगाची प्रवेशिका "सकाळ'च्या बातमीदारांकडे उपलब्ध आहेत. प्रत्येक दिवसासाठी प्रत्येकी 300 रुपये तिकीट शुल्क आहे.
नाट्य महोत्सवाच्या तिकिटांसाठी संपर्क
आंबेगाव तालुका
गार्गी ऍड सेंटर, मंचर - 7350000449, सुदाम बिडकर, पारगाव - 9975599690, नवनाथ भेके, निरगुडसर - 9503894951, जयदीप हिरवे, पेठ. - 9096276483, विवेक शिंदे, महाळुंगे - 9766587230, चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव - 9011017849, अरुण सरोदे, शिनोली - 9922821821,
खेड तालुका
विलास काटे, आळंदी - 8788477057, हरिदास कड, चाकण - 9881907169, राजेंद्र सांडभोर, राजगुरुनगर - 9766119999, रूपेश बुट्टे, आंबेठाण- 9850070174, राजेंद्र लोथे, चास - 7588626288, गणेश फलके, कुरुळी - 8379926514, महेंद्र शिंदे, कडूस - 9922419249, सदाशिव अमराळे, दावडी - 9226715533,
जुन्नर तालुका
रवींद्र पाटे, नारायणगाव - 9922913286, दत्ता म्हसकर, जुन्नर - 9011017852, मिनानाथ पानसरे, आपटाळे - 9096328377, पराग जगताप, ओतूर - 9561163000, अमोल थोरवे, शिरोली - 9552556271, अर्जुन शिंदे, आळेफाटा - 9975156456, सिद्धार्थ कसबे, पिंपळवंडी - 7757891409.
अधिक माहितीसाठी संपर्क - संतोष पोटे- 9881718817, डी. के. वळसे पाटील - 9822076699.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.