
खासगी विद्यापीठांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेरा CET
पुणे : प्रीमिनन्ट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशन (पेरा) या राज्यातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘पेरा सीईटी २०२२’ परीक्षा येत्या २६ ते २८ दरम्यान ऑनलाइन प्रॉक्टर्डद्वारे घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अभियांत्रिकी, बायोइंजीनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाइन आर्ट्स, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, विधी आणि कृषी अभियांत्रिकी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या ऑनलाइन नाव नोंदणीसाठी २० मे ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल ३ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, पेराचे उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी दिली.
पेरा ही खासगी विद्यापीठांची संघटना दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सीईटीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना राज्यातील १५ खासगी विद्यापीठांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ‘www.peraindia.in’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले आहे.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वकर्मा विद्यापीठ, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोर्फेशनल युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, स्पायसर ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी, एमआयटी डब्ल्युपीयु युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील विद्यापीठ, श्री बालाजी विद्यापीठ (पुणे), संदीप विद्यापीठ (नाशिक), संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर), एमजीएम विद्यापीठ (औरंगाबाद), विजयभूमी युनिव्हर्सिटी, सोमय्या विद्यापीठ (मुंबई), डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर आणि टेक्निकल विद्यापीठ (कोल्हापूर) ही विद्यापीठ पेरा संघटनेचे सदस्य आहेत
Web Title: Pera Cet Admission Vocational Courses Private Universities
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..