esakal | पुणेकरांमध्येच अँटीबॉडीज् जास्त का? काय आहे कारण?
sakal

बोलून बातमी शोधा

the percentage of citizens with antibody is more In Pune

र्थातच कोरोनाविरुद्ध समूह रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाली का? या प्रश्‍नाला उधाण येऊ लागले. या व अशा अनेक प्रश्‍नांचा घेतलेला हा आढावा.. 

पुणेकरांमध्येच अँटीबॉडीज् जास्त का? काय आहे कारण?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : दिल्ली आणि मुंबईनंतर पुणे शहरातील पाच प्रभागांच्या सिरो सर्वेक्षणाचा (रक्त चाचण्या) निकाल सर्वांसमोर आला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण ही तसेच आहे, दोन मोठ्या शहरांच्या तुलनेत पुण्यात प्रतिपींडे (अँटीबॉडी) असलेल्या नागरिकांची टक्केवारी जास्त निघाली. अर्थातच कोरोनाविरुद्ध समूह रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाली का? या प्रश्‍नाला उधाण येऊ लागले. या व अशा अनेक प्रश्‍नांचा घेतलेला हा आढावा.. 
 
- पुण्यात टक्केवारी जास्त का? 
दिल्ली आणि मुंबईतील सिरो सर्वेक्षण जून-जुलै महिन्यात झाले, तर पुण्यात जुलै-ऑगस्टमध्ये करण्यात आला आहे. अनलॉकमुळे कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे लक्षण न दिसणाऱ्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. तसेच शहरात सर्वेक्षणासाठी अत्याधिक कोरोना प्रसार असलेल्या प्रभागांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे टक्केवारी जास्त निघाली. 
 
ज्येष्ठांमध्ये प्रसार कमी का? 
कोरोना मृत्यूंमध्ये ज्येष्ठांची संख्या जास्त असल्याचे सुरवातीपासून समोर येऊ लागले. त्यामुळे महापालिकेने निर्देशतर दिलेच पण त्याचबरोबर नागरिकांनीही ज्येष्ठांची विशेष काळजी घेतली. पर्यायाने इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये (66 वर्षांपुढील) कोरोनाचा प्रसार कमी दिसल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. 

म्हणून हर्ड इम्यूनिटीबद्दल साशंकता 
समूह रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित होण्यासाठी निदान 70 ते 80 टक्के लोकांना विषाणूची लागण व्हावी लागते. देशात अजून तशी स्थिती नाही. पुण्यातील सर्वेक्षणात अत्याधिक प्रसार असलेल्या निवडक प्रभागांमधील अँटीबॉडी तपासण्यात आल्या आहे. त्यामुळे त्याला मर्यादा आहे. तसेच, तयार झालेली अँटिबॉडी कोरोनाशी लढण्यास सक्षम आहे का ? शरीरात किती दिवस राहतात? हे तपासावे लागेल. त्यासाठी पुन्हा महिन्यांनी सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याचे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. आरती नगरकर यांनी सांगितले. 

देशातील सिरो सर्वेक्षणे 

1) नवी दिल्ली 
रक्त नमुने : 21,000 
अँटीबॉडी असलेले नमुने : 23.8 टक्के 

2) मुंबई :
रक्त नमुने : 7,000 
अँटीबॉडी असलेले नमुने : सरासरी नागरिकांमध्ये : 16 टक्के , झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्ये : 57 टक्के 


3) पुणे 
रक्त नमुने : 1,664 
अँटीबॉडी असलेले नमुने  51.5 टक्के 


4) भारत (थायरोकेअर लायब्रोटरी) 
रक्त नमुने : 2 लाख 
अँटीबॉडी असलेले नमुने : 24 टक्के 


''सर्वेक्षणाच्या काळात स्थानिक नगरसेवक, वॉर्ड अधिकारी आणि समाजसेवी संस्थांची खूप मदत झाली. पर्यायाने आम्हाला नमूने मिळविण्यास साहाय्य झाले. अशा सर्वेक्षणांमुळे भविष्यात येणाऱ्या साथींची पूर्वतयारी आणि प्रसाराची पद्धत अभ्यासण्यास जास्त मदत होणार आहे.''
- डॉ. आरती नगरकर, आरोग्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

loading image
go to top