Vidhan Sabha 2019 : पुण्यात मतदानाची टक्केवारी कमीच; पण कोथरुडमध्ये...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

पुणे शहरातील मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी दुपारी तीनपर्यंत खूपच कमी असून, मतदारांच्या निरुत्साहामुळे यंदा मतदानाची टक्केवारी पन्नास टक्‍क्‍यांच्या आसपास पोहोचणार की नाही, अशी स्थिती आहे.

पुणे : पुणे शहरातील मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी दुपारी तीनपर्यंत खूपच कमी असून, मतदारांच्या निरुत्साहामुळे यंदा मतदानाची टक्केवारी पन्नास टक्‍क्‍यांच्या आसपास पोहोचणार की नाही, अशी स्थिती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील कसबापेठ व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील मतदानकेंद्रांवर मतदारांनी सर्वांत कमी उपस्थिती लावली आहे.

कसबा पेठेत दुपारी तीन वाजेपर्यंत 26.33 टक्के, तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मतदारसंघात 27.72 टक्के मतदानांची नोंद झाली. त्याखालोखाल शिवाजीनगरमध्ये 28.76 टक्के मतदान झाले. या तीन मतदारसंघांत भाजपच्या सामना आघाडीतील काँग्रेसशी असून, अन्य पक्षांचे उमेदवार, तसेच अपक्षही रिंगणात आहेत. हडपसरमध्ये होत असलेल्या चुरशीच्या लढतीमध्ये शहरातील सर्वांधिक म्हणजे 41.16 टक्के मतदानाची नोंद आत्तापर्यंत झाली असून, मतदान संपेपर्यंत तेथील मतदान 55 टक्‍क्‍यांचा आकडा पार करण्याची शक्‍यता आहे.

कोथरूड या सर्वांधिक चर्चेच्या मतदारसंघात दुपारपर्यंत 35.32 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पर्वतीमध्ये 33.06 टक्के, तर वडगावशेरीमध्ये 32.07 टक्के मतदान झाले. मतदानाच्या शेवटच्या दोन तासांना मतदानाचा वेग नेहमीच वाढतो. या कालावधीत किमान 14 ते 15 टक्के मतदानाची नोंद होते. ती गृहित धरली, तरी शहरातील मतदान 50 टक्‍क्‍यांच्या आसपासच पोहोचण्याची शक्‍यता आहे. 

50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान

विधानसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ वगळता शहरातील अन्य सातही मतदारसंघांत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. कसबा पेठ मतदारसंघात 2014 मध्ये सर्वांधिक म्हणजे 61 टक्के मतदान झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Percentages of Voting are less in Pune Maharashtra Vidhan Sabha 2019