esakal | लाईट... ॲक्शन... कॅमेरा...; चित्रीकरणासाठी आठवडाभरामध्ये परवानगी

बोलून बातमी शोधा

Shooting
लाईट... ॲक्शन... कॅमेरा...; चित्रीकरणासाठी आठवडाभरामध्ये परवानगी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात चित्रपट चित्रीकरणाला 9Movie Shooting) आठवडाभरात परवानगी (Permission) देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशीही संवाद साधणार असल्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक सेलच्या शिष्टमंडळाला मंगळवारी दिले. (Permission for Movie Shooting within a week)

नाट्य, चित्रपट, लोककलावंत, तंत्रज्ञ आणि जादूगार यांनाही आर्थिक मदत करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. राज्य सरकारने कष्टकरी वर्गाला लॉकडॉउनच्या काळात मदत म्हणून आर्थिक मदत जाहीर केली आहे. परंतु, पडद्यामागील कर्मचारी तसेच लोककलावंतांना कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे नवोदित कलाकारांचेही हाल होत आहेत.

नाट्यप्रयोग, चित्रपट आणि चित्रीकरण बंद असल्यामुळे या वर्गाचे हाल होत आहेत. तसेच गेल्या वर्षी मार्चपासून राज्यात चित्रीकरणाला बंदी होती. नोव्हेंबरच्या अखेरीस ती उठविण्यात आली. परंतु, आता पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण परराज्यात होत आहे. या बाबतचे वृत्त ‘सकाळ’ने नुकतेच दिले होते. ते पुनर्वसन मंत्र्यांच्या निदर्शनास आणले. चित्रीकरणाच्या सेटवर सर्व प्रकारची काळजी घेऊन ते करणे शक्य असल्याचेही सेलचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी त्यांच्या निदर्शनास आणले.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा