मंगल कार्यालयात पुन्हा घुमणार सनईचे सूर; 'या' असतील अटी आणि शर्ती

Permission granted for weddings and events in Wedding Hall
Permission granted for weddings and events in Wedding Hall

कोळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शासनाने ५० लोकांच्या मर्यादेत सामाजिक अंतर पाळून लग्न समारंभांना परवानगी दिली होती. पण, कोणत्या ठिकाणी लग्न समारंभ करावेत, याबाबत स्पष्टता नव्हती. पावसाळ्यात तोंडावर होणारी लग्न कार्ये लक्षात घेऊन खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर, घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ पार पडण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी सर्व विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. मार्च, एप्रिल, मे असे अडीच महिने लॉकडाउन राहिले. पण, जूनमध्ये लोकडॉउनमध्ये विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत करण्यासाठी शिथिलता देण्यात आली. बंदच्या काळात होणारी लग्न कार्य सुरवातीला बंद ठेवली. मात्र, त्यानंतर सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन काही अटी आणि शर्तीवर लग्नकार्य करण्यास परवानगी दिली. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखताना गर्दी टाळून केवळ ५० लोकांच्या मर्यादेत सामाजिक अंतर पाळून लग्न समारंभ करण्याची परवानगी दिली होती; पण, लग्न समारंभ कोणत्या ठिकाणी पार पडतील, याबाबतचा उल्लेख आदेशात नव्हता. त्यामुळे मंगल कार्यालये , सभागृहे , खुले लॉन येथे लग्न समारंभ होत नसल्याने या व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील सर्वच मंगल कार्यालये ओस पडली होती. त्यामुळे लग्न समारंभ मंगल कार्यालयात करण्याबाबतची परवानगी मिळावी, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निवेदने आली होती.

५० लोकांच्या उपस्थित घराच्या परिसरात लग्न समारंभ करणे पावसाळ्यात अडचणीचे होणार होते. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पावसाळ्याचा विचार करून यापुढे लग्न कार्ये करण्यासाठी खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, सभागृहे, घर व घराचा परिसरात ५० लोकांच्या मदित सामाजिक अंतराची अट पाळून लग्न समारंभांना परवानगी देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे मंगल कार्यालये, हॉल, सभागृहे, खुले लॉन येथे शुभमंगल होणार आहेत.
---------
डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार
---------
पाकिस्तानवर मोठी नामुष्की; 'या' यादीतील नाव कायम
---------
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शासन अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू करण्यात आल्या असून सर्व संबंधित प्रशासकिय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना विरूध्द भारतीय साथ अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, व भारतीय दंड संहिता (४५ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

अटी व शर्ती :

  1. लग्न समारंभाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
  2. लग्न समारंभाच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कारवाईस पात्र राहील.
  3. लग्न समारंभाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सोशल डिस्टेंसिंग सहा फूट राखणे बंधनकारक राहील.
  4. लग्न समारंभाच्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाण्यास व मद्यपानास सक्त मनाई राहील.
  5. लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  6. लग्न समारंभाच्या आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर या करिता संंबंधित विनावातानुकूलित मंगल कार्यालय /हॉल/खुले लॉन/सभागृह व्यवस्थापक/मालक यांच्यामार्फत व्यवस्था करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत वातानुकूलित सेवेचा (एसी) वापर करण्यात येऊ नये.
  7. लग्न समारंभाच्या ठिकाणी बसण्याच्या जागा सामाजिक अंतर राहील अशा पद्धतीने खुणा (मार्किंग) करुन निश्चित करण्यात याव्यात.
  8. लग्न समारंभाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापक / मालक यांच्या मार्फत करण्यात यावी.
  9. लग्न समारंभाच्या ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह तात्काळ बंद करण्यात येतील.

भूगाव -भुकुम परिसरात सुमारे बारा मंगल कार्यालये आहेत. पुण्यापासुन हाकेच्या अंतरावर निसर्गरम्य हे ठिकाण असल्याने लग्नसराईत अनेक लग्न इथं पार पडतात. येथील अनेक मंगलकार्यालय मालकांनी बँकेची कर्जे घेऊन कार्यालये उभी केली आहेत. कार्यालयातील समारंभच बंद असल्याने बँकांचे हप्ते, जागेचे भाडे, कर्मचारी पगार, लाईट बील, व इतर देणी देता येत नाहीत. अनेक जण त्यामुळे तणावात होते. कार्यक्रमांवर अवलंबून असणाऱ्या मंडप, आचारी, वाजंत्री यांसारख्या इतर घटकांवरही उपासमारीचं संकट कोसळले आहे. कार्यालयांत पुन्हा सनईचे सुर घुमनार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

परवानगीसाठी हे करा
मंगल कार्यालयात विवाह करण्यासाठी शासनाने काही नियम व अटीवर परवानगी दिली आहे. त्यासाठी विवाह होणाऱ्या स्थानिक पोलिस ठाण्यात अर्ज करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर तहसिल कार्यालयातही अर्ज करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com