दगड खाणींबाबत झाला महत्त्वाचा निर्णय...

stone1.jpg
stone1.jpg

किरकटवाडी (पुणे) : पुणे जिल्ह्यामध्ये कंटेनमेंट झोन वळता इतर ठिकाणी सर्व प्रकारच्या बांधकामांना सुरू करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे; त्यामुळे बांधकामासाठी लागणारी खडी, क्रश सॅंड, डबर व इतर बाबींचा पुरवठा व्हावा म्हणून व मजुरांना काम मिळावे, मजुरांचे स्थलांतर थांबावे म्हणून मायक्रो कंटेनमेंट झोन नसलेल्या ठिकाणच्या शासकीय परवाना प्राप्त दगड खाणींना स्टोन क्रेशर सुरू करण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

याबाबत महसूल प्रशासनाला सूचना देऊन दगड खाणींवरुन मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही. याबाबत कळवले असल्याचे जिल्हाधिकारी राम यांच्याकडून सांगण्यात आले. हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दगड खाणीवरून वाहतूक करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून परवाना घ्यावा असे तोंडी आदेश वाहतूकदारांना करून वाहने अडवली होती.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी- क्लिक करा

खडकवासला मंडलाधिकारी रोहिदास जाधव यांनी तहसीलदारांच्या आदेशावरून किरकटवाडी येथे पाच डंपर चालकांवर कारवाई केली होती. सदर बाब जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर अशा कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com