इंदापूरकरांनी अखेर लढाई जिंकली, बारामतीनंतर... 

डॉ. संदेश शहा 
Tuesday, 12 May 2020

इंदापूर येथील व्यापारी पेठ सुरू करण्यासाठी बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सोमवारी (ता. 11) रात्री उशिरा काही अटींवर परवानगी दिली. 

इंदापूर (पुणे) : इंदापूर येथील व्यापारी पेठ सुरू करण्यासाठी बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सोमवारी (ता. 11) रात्री उशिरा काही अटींवर परवानगी दिली. त्यानुसार मंगळवारपासून (ता. 12) रोटेशन पद्धतीने व्यापारी बाजारपेठ सुरू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. 

पुण्याची जिद्दी कन्या, बाळंतपणातून उठून लढतेय ओडिशात कोरोनाची लढाई...  

संचारबंदीमुळे इंदापूरची बाजारपेठ गेल्या 52 दिवसांपासून बंद होती. त्यातून संपूर्ण अर्थकारण ठप्प झाले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांना साकडे घातले होते. शहरात एकही कोरोना रुग्ण सापडला नसताना शहरास "डेंजर झोन'मध्ये टाकल्याने सर्वजण नाराज होते. त्यातच बारामतीत कोरोना रुग्ण सापडले असताना बारामतीत दुकाने सुरू झाली, मात्र इंदापूरला एकही रुग्ण सापडला नसताना "रेड झोन'मध्ये टाकण्यात आले. हे चुकीचे असून, शहराचा समावेश "ग्रीन झोन'मध्ये करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, संघाचे संस्थापक मुकुंद शहा व भरत शहा, नरेंद्र गांधी सराफ, सराफ संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास बानकर, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, बंडू बोत्रे आदींनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना धन्यवाद दिले. 

वा रे पठ्ठ्या, उजनीत धरणात बुडत होते सहा जण...  

काने सुरू करण्याचे वेळापत्रक 
सोमवारी व गुरुवार ः वाहनांचे सर्व्हिसिंग, संगणक, इलेक्‍ट्रॉनिक, रेडिमेड, फर्निचर, मोबाईल, फोटो स्टुडिओ, स्वीट होम, फुले व पुष्पहार दुकाने. 
मंगळवार व शुक्रवार ः कापड दुकाने, भांडी, शिलाई, फूटवेअर, सोन्या चांदीचे दुकाने, घड्याळे, सुटकेस व बॅगा, दोरी, पत्रावळी. बुधवार व शनिवार ः स्टेशनरी, कटलरी, स्टील, टायर्स, सायकल, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरिअल, पेंट, झेरॉक्‍स, डिजिटल फ्लेक्‍स, प्रिंटिंग प्रेस, माती व भांड्यांची दुकाने, टोपल्या व बांबूची दुकाने. 
जीवनावश्‍यक सेवेअंतर्गत किराणा माल दुकाने, भाजीपाला, फळे, दूध, शेतीविषयक बी, बियाणे औषधे हे व्यवसाय रोज सुरू आहेत. मात्र, अद्याप सलून दुकाने सुरू नाहीत. दारू खरेदीसाठी मात्र आजदेखील मोठी रांग होती. 

इंदापूर शहरात सर्वांनी शासकीय सूचनांचे पालन केल्याने एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. इंदापूरकरांनी सहकार्य केल्यामुळे हे शक्‍य झाले. त्याचा आदर्श "इंदापूर पॅटर्न' तयार झाला आहे. त्यामुळे सर्वांनी शासकीय सूचनांचे पालन करून शहर कोरोनामुक्त ठेवण्यास सर्वोच्च सहकार्य करावे. 
- अंकिता शहा
नगराध्यक्षा, इंदापूर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission to start shops at Indapur