

Nasrapur Crime Case
esakal
पुणे - नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीच्या अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधील दिसणारा व्यक्ती मीच आहे, अशी कबुली आरोपी भीमराव कांबळे शुक्रवारी (ता. १९) न्यायालयात दिली. मात्र, त्याआधी त्याने ती व्यक्ती तो नसून पीडित मुलीलाही ओळखत नसल्याचा कांगावा करत बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला सर्व फुटेज सहा ते सात वेळा झूम करून दाखविण्यात आले. अखेर, त्याने ती व्यक्ती आपणच असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद आज शनिवारी (ता. २०) होणार आहे.