

पूर्ववैमनस्यातून एकाच्या डोक्यात दगड मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात न्यायालयाने एकास साडेसहा वर्ष सक्तमजुरी आणि दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पुणे - पूर्ववैमनस्यातून एकाच्या डोक्यात दगड मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात न्यायालयाने एकास साडेसहा वर्ष सक्तमजुरी आणि दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जखमी झालेल्या व्यक्तीवर आत्तापर्यंत उपचार करण्यात येत असून त्यासाठी मोठा खर्च झाला आहे. तसेच जखमी व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यास शक्य तितकी जास्त नुकसान भरपार्इ मिळावी, अशी मागणी सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली होती.
अनिल ऊर्फ काळ्या दत्तू सरवदे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत शशिकांत भारत कदम यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अनिल सरवदेसह सहदया ऊर्फ सहदेव अभिमान सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहदया सरवदे याची न्यायालयाने सुटका केली आहे. चिंचवडमधील आनंदनगरमध्ये १३ मार्च २०१६ रोजी घडलेल्या या घटनेत फिर्यादी यांचा लहान भाऊ रशिकांत ऊर्फ लखन भारत कदम हे जखमी झाले होते.
रशिकांत कदम आणि आरोपींचे घटनेच्या काही दिवसांपूर्वी भांडण झालेले होते. त्याचा राग मनात धरून सहदया याने रशिकांत यांना घराच्या बाहेर बोलावले आणि अनिल याने त्यांच्या डोक्यात दोनदा दगड मारला, अशी फिर्याद देण्यात आली होती. दंडाची रक्कम रशिकांत यांना देण्यात यावी. तसेच उपचारासाठी झालेल्या उर्वरित खर्चाची योग्य ती नुकसान भरपार्इ मिळण्यासाठी प्रक्रीया करण्यासाठी निकालाची प्रत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास पाठविण्यात आली आहे, असे निकालात नमूद आहे.
जखमी व त्यांच्या बहिणीचे लग्न पुढे ढकलावे लागले
या खटल्याचे कामकाज ॲड. फरगडे यांनी पाहिले. गुन्हा शाबीत करण्यासाठी त्यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात रशिकांत हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यासाठी आत्तापर्यंत सहा लाख रुपये खर्च आला आहे. नुकतीच रशिकांत यांच्यावर अडीच लाख रुपयांची शस्त्रक्रिया करण्यात आली. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे उपचारांसाठी पैसे खर्च झाल्याने रशिकांत आणि त्यांच्या छोट्या बहिणीचे लग्न पुढे ढकलावे लागले, या सर्व बाबींचा विचार आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा आणि दंड ठोठावण्याचा युक्तिवाद ॲड. फरगडे यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.