esakal | पुणे : शनिवारवाड्याजवळ पेशवेकालिन हौद सापडला

बोलून बातमी शोधा

Water Tank
पुणे : शनिवारवाड्याजवळ पेशवेकालिन हौद सापडला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या वतीने शनिवारवाडा परिसरात रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना पेशवेकालिन पाण्याचा हौद सापडला. या हौदातून पाणी शेंदण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून, हौदात झऱ्यावाटे वाहत येणारे पाणी एकदम निर्मळ आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीची ही जलव्यवस्था पाहून सारेच आवाक झाले.

शनिवारवाड्याच्या शनिवार पेठेच्या बाजूला मलःनिस्सारणाच्या वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी खोदकाम सुरू होते. त्यावेळी काही फूट खोलीवर पाण्याचा झरा लागला. थोडे अजून खणले असता घडीव दगडातील पायऱ्या आणि हौद दिसला. झऱ्यातून हौदात येणारे पाणी शुद्ध असून, हा झरा हौदातून पुढे वाहत आहे.

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले की, नानासाहेब पेशवे यांनी १७४९ मध्ये कात्रज परिसरात दोन तलाव बांधले होते. या तलावांतील पाणी त्यांनी शहरभर फिरविले होते. यासाठी त्यांनी नहरींचा वापर केला होता. हा त्या पाणी वितरण व्यवस्थेचाच एक भाग असावा. पुढे इंग्रजांनी ही वितरण व्यवस्था १९२० पर्यंत कायम ठेवली होती. यातील गाळ काढून त्याद्वारेच शहराला पाणीपुरवठा केला जात होता.