...तर पेट्रोल आणि डिझेलचे दर निम्म्याने कमी होतील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

सध्या राज्यात पेट्रोलची मूळ किंमत 24.62 रुपये आहे. त्यावर केंद्र सरकारचे 32.98 तर राज्य सरकारचा 25.30 रुपये कर आकारण्यात येत आहे तर डीलरच्या कमिशन पोटी 3.16 वाहनचालकांना मोजावे लागत आहेत. डिझेलची मूळ किंमत 26.4 रुपये असून केंद्राचा 31.83 आणि राज्य सरकारचा 17.5 रुपये कर तर 2.53 रुपये डीलरचे कमिशन घेतले जात आहे.

पुणे : पेट्रोल आणि डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याच्या नुसत्या पोकळ चर्चा होत आहेत. मात्र कोणतेही सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नसून त्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध करांमुळे इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल जर जीएसटीच्या अंतर्गत आले राज्यातील त्याच्या किमती निम्म्याने कमी होतील, असा विश्वास माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सध्या राज्यात पेट्रोलची मूळ किंमत 24.62 रुपये आहे. त्यावर केंद्र सरकारचे 32.98 तर राज्य सरकारचा 25.30 रुपये कर आकारण्यात येत आहे तर डीलरच्या कमिशन पोटी 3.16 वाहनचालकांना मोजावे लागत आहेत. डिझेलची मूळ किंमत 26.4 रुपये असून केंद्राचा 31.83 आणि राज्य सरकारचा 17.5 रुपये कर तर 2.53 रुपये डीलरचे कमिशन घेतले जात आहे. एकाच वस्तूसाठी वेगवेगळे कर भरावे लागत असल्याने व त्याची टक्केवारी देखील मोठी असल्याने इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आले तर मूळ किमतीवर 28 टक्के पेक्षा जास्त कर लावता येणार नाही. त्यामुळे मूळ किंमत 24.62 रुपये प्रति लिटर पेट्रोलवर 28 टक्के जीएसटी लावला तर त्याची किंमत 31.51 रुपये होते. तर डिझेल 33.33 रुपये प्रति लिटर होईल. अगदी पन्नास रुपये प्रति लिटर जीएसटी आकारला तरी ही किंमत 40 रुपयांच्या घरात जाईल. हे दर आत्ताच्या किमतीच्या तुलनेत निम्मेच आहेत.
गेल्या चार महिन्यात पेट्रोलवर 16 रुपये तर डिझेलवर 19 रुपयांचा कर वाढला आहे, असे वेलणकर यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंदोलन करणार कोण? : 
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. त्यामुळे वाढत्या दराबाबत आवाज उठवणार तरी कोण असा प्रश्न निर्माण होतो. इंधन दरवाढीविरोधात यापूर्वी शहरात आणखी आंदोलने झाली आहेत. यावेळी मात्र काही होताना दिसत नसल्याचे वेलणकर म्हणाले.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​
पेट्रोल
मूळ किंमत               24.62 रुपये  
केंद्र सरकार कर         32.98 रुपये 
राज्य सरकार कर       25.30 रुपये
डीलरचे कमिशन        3.16 रु 

डिझेल 
मूळ किंमत                   26.04 रूपये
केंद्र सरकार कर            31.83  रुपये 
राज्य सरकार कर          17.05 रुपये
डीलरचे कमिशन           2.53 रु


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol and diesel need to come under GST said Vivek Welankar