पुण्यातील नागरिकांना पेट्रोल, डिझेल मिळणार का? तर प्रशासन म्हणतेय...

पुण्यातील नागरिकांना पेट्रोल, डिझेल मिळणार का? तर प्रशासन म्हणतेय...
Updated on

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वसामान्य नागरिकांना तूर्त मिळणार नसल्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी बुधवारी सकाळी स्पष्ट केले आहे. पेट्रोल पंपांची वेळ आज निश्चित होणार आहे. तोपर्यंत पंप सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत खुले राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आणि संबंधितांना सध्या पेट्रोल दिले जाणार आहे. सर्वसामान्यांनाही पेट्रोल मिळणार असल्याचे वृत्त म्हणजे अफवा असल्याचे जिल्हा प्रशासनाने, पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात मात्र उद्योगांना विनापास पेट्रोल, डिझेल देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तसेच पेट्रोल पंपाची वेळ आणि दुकानाची वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन अशी ठेवायची का त्यामध्ये वाढ करायची, याचा निर्णय आज दिवसभरामध्ये होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता याबाबत दुपारी बैठक होणार असून त्यामध्ये वेळ वाढविण्याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यात शहरामध्ये काल दिवसभरात कोरोनाच्या 65 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील संख्या आता 1943 वर पोचली आहे. पुण्यात कोरोनातून 535 जणांना मुक्ती मिळाली असून, काल एका दिवसांत 52 जण कोरोनातून बरे झाले आहेत. पुण्यात 30 मार्चपासून आतापर्यंत पुण्यात 115 मृत्यू झाले आहेत. तर जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण संख्या आता 2201 वर पोचली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्य सरकारच्या आदेशानंतर नागरिकांना सोमवारपासून त्यांच्या गावी जाण्यास पोलिसांनी परवानगी देण्यास सुरुवात केली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी वैयक्तिक पातळीवर साडे बारा हजार जणानी पुणे पोलिसांकडे मंगळवारी अर्ज केले. त्यापैकी दोन हजार जणांना तत्काळ परवानगी देण्यात आली.

राज्य सरकारच्या आदेशानंतर सोमवारी साडे पंधरा हजार नागरिकांनी पुणे पोलिसांकडे नोंदणी केली होती. तर मंगळवारी बारा हजार 590 नागरिकांनी नोंदणी केली. त्यापैकी 2038 नागरिकांना गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com