
- पेट्रोलच्या शतकाला पाच रुपयांची कमी
- डिझेल ८४.६८ रुपये लिटर
Petrol Price: पुण्यात पेट्रोलच्या शतकाला अवघ्या काही 'धावा' उरल्या
पुणे : प्रतिलिटर ९३ रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठल्यानंतरही पेट्रोल (Petrol Price) दरवाढीची घौडदौड अजूनही सुरूच आहे. सोमवारी (ता.१५) शहरात पेट्रोलची किंमत ९५ रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रतिलिटर किमतीचे शतक छळकविण्यासाठी पेट्रोलचे दर फक्त पाच रुपयांपासून दूर आहेत.
अनलॉकनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढतच आहेत.
गेल्या वर्षाअखेरीस दरांत काहीशी घट झाली होती. मात्र जानेवारीपासून भडका वाढतच आहेत. अगदी या महिन्याच्या सुरवातीपासून वाढत्या किंमत लक्षात घेता फेब्रुवारीअखेर पेट्रोल १०० रुपये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिसेंबरनंतर इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला होता. तसेच वाहन चालकांना या दरांमुळे बसणारी छळ पाहता राज्य किंवा केंद्र सरकार कर कमी करतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्याच्या उलटे होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
- खेड-शिवापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगचं काय होणार? स्थानिक संभ्रमात
सोमवारी राज्यातील इतर शहरांतील पेट्रोलच्या किंमती -
परभणी - ९७.५७
नांदेड - ९७.४७
जालना - ९६.४६
रत्नागिरी - ९६.०६
जळगाव- ९६.०५
शहरातील इंधनाचे दर -
पेट्रोल - ९५.१० प्रतिलिटर
डिझेल - ८४.६८ प्रतिलिटर
सीएनजी - ५५.५० प्रतिकिलो
- Breaking : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात
पूर्वी इंधनाचे दर एक दोन रुपयांनी वाढले तर विरोधक मोठ्या प्रमाणात आंदोलने करीत. मात्र आता एवढ्या किंमत वाढूनही पूर्वीसारखे आंदोलन होत नाहीत. केंद्रांत आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सत्ता असल्याने हे चित्र आहे. आंदोलनांपेक्षाही सध्या किमती कमी होणे गरजेचे आहे.
- आनंदा पाटोळे, दुचाकीधारक नोकरदार
सातत्याने वाढणारे डिझेलच्या किंमतीबाबत शनिवारी (ता. १३) ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या देशभरातील मॅनेजिंग कौन्सिल सभासदांची बैठक झाली. याबाबत केंद्र सरकारला १५ दिवसाची नोटीस देण्याबाबत ठराव मंजूर झाला आहे. केंद्र सरकारने दरवाढ कमी करावी, अन्यथा देशपातळीवर चक्का जाम आंदोलन पुकारण्यात येईल.
- बाबा शिंदे, सदस्य, ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
Web Title: Petrol And Diesel Prices Fresh Record Highs Pune City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..