esakal | इंधन दरवाढीचा वेग सुसाट; पेट्रोल स्थिर, डिझेलची मात्र दरवाढ मात्र सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol diesel price rise continues through the fortnight
  • पेट्रोल स्थिर; डिझेलची दरवाढ मात्र सुरूच
  • गेल्या 20 दिवसांत डिझेल 1.04 रुपयांनी महागले

इंधन दरवाढीचा वेग सुसाट; पेट्रोल स्थिर, डिझेलची मात्र दरवाढ मात्र सुरूच

sakal_logo
By
सनिल गाडेकर

पुणे : गेल्या महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये इंधनाची दरवाढ बरीचशी मंदावली आहे. एक जुलैपासून पेट्रोलचे दर स्थिर असून डिझेलच्या किंमतीत मात्र 1.04 रुपयांनी वाढ झाली आहे. शहरात आज पेट्रोल 86.89 रुपये तर डिझेल 78.39 रुपये प्रति लिटर आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पेट्रोल दरवाढ थांबल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळात आहे. मात्र डिझेलची आस्तेकदम 80 रुपये प्रति लिटर दराकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कोरोना काळातही पुणेकरांना इंधन दरवाढीचे चटके सोसावे लागत आहेत. गेल्या महिन्यात डिझेलच्या किमतीत 10.36 रुपयांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल 7.99 रुपयांनी महागले आहे. सीएनजीचे दर मात्र 53.80 रुपयांवर स्थिर होते.

1 जुलै पासून दरवाढ
एक जुलै रोजी त्यात एक रुपयांनी वाढ झाली. एक जूनपासून लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या काही सवलतीनंतर इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक जून रोजी राज्य सरकारने अधिभार वाढवला आहे. इंधन अधिभार वाढविल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर सुसाट सुटलेल्या इंधन दरवाढीच्या गाडीचा वेग या महिन्यात काहीसा मंदावला आहे.

या महिन्यात किमती स्थिर राहतील असा अंदाज
या महिन्यात इंधनाच्या किमती स्थिर राहतील, असा अंदाज तज्ञांनी वर्तवला होता. त्यानुसार महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस दर बदलले नाहीत. मात्र आता पुन्हा दरवाढ सुरू झाली असून डिझेलच्या किमतीत 15 ते 30 पैशांची दरवाढ होत आहे. किंमतील वाढ अशीच सुरू राहिली तर लवकरच डिझेल 8 रुपये प्रति लिटर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एक जुलैचे दर
पेट्रोल - 86.89
डिझेल - 77.35
सीएनजी - 54.80

आजचे दर : 
पेट्रोल 86.89 
डिझेल 78.39
सीएनजी 54.80

loading image