esakal | आधीच कडकी त्यात इंधन दरवाढीने भरतीय धडकी; सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

आधीच कडकी त्यात इंधन दरवाढीने भरतीय धडकी; सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ

कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असले तरी गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत चालले आहेत.

आधीच कडकी त्यात इंधन दरवाढीने भरतीय धडकी; सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असले तरी गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत चालले आहेत. आज (ता. १८) पुण्यातील पेट्रोलचा दर ८४.३८ रुपयांवर जाऊन पोहोचला असल्याने वाहन चालक हैराण झाले आहेत. दरम्यान, सोमवारपासून हे दर स्थिर रहाण्याची शक्यता असल्याचे, असे आॅल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनने स्पष्ट केले होते. परंतु, असे काहीही झालेले नाही उलट या आठवड्याच्या शेवटपर्यंत दर वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

लाॅकडाऊन मुळे पुण्यातील व्यवहार सुरळीत होत असताना रस्त्यावरील वाहतूक वाढत आहे. संचारबंदीच्या काळात पुण्यातील अनेक रस्ते, बाजारपेठ, कार्यालय बंद असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता तुरळक वाहतूक  सुरू होती. तसेच पेट्रोल विक्रीवर ही निर्बंध आणले गेल्यानेही नागरिक विनाकारण गाडी बाहेर काढायला नकोच यावर ठाम होते. एप्रिल व मे महिन्यात सलग ४६ दिवस पेट्रोलचे दर ७६. ०७ रुपये, तर -डिझेलचे दर ६४.९७ पेशावर स्थिर होते. पण त्याचा फायदा वाहनचालकांना घेता आला नव्हता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तीन जून नंतर पुण्यातील व्यवहार सुरू झाले आहेत, सर्व प्रकारचे दुकाने उघडली आहेत, तर कमी मनुष्यबळावर खासगी कार्यालये सुरू झाली आहेत, मात्र याच काळात इंधन वाढीचा फटका पुणेकरांना बसला आहे. रुपयाच्या तुलनेत डाॅलर मजबूत होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅलर ४५ रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत गेले आहेत. 

७ जून 
पेट्रोल 78.67
डिझेल 67.55

८ जून
पेट्रोल 79.25
डिझेल 68.11

९ जून
पेट्रोल 79.77
डिझेल 68.65

१० जून
पेट्रोल 80.15
डिझेल 69.07

११ जून 
पेट्रोल 80.73
डिझेल 69.62

१२ जून
पेट्रोल 81.27
डिझेल 70.17

१३ जून
पेट्रोल 81.84
डिझेल 70.71

१४ जून
पेट्रोल 82.43
डिझेल 71.31

१५ जून
पेट्रोल 82.89
डिझेल 71.86

१६ जून
पेट्रोल 83.34
डिझेल 72.39

१७ जून 
पेट्रोल 83.87
डिझेल 72.94

१८ जून
पेट्रोल 84.38
डिझेल 73.54

loading image