
जुन्नर : गेल्या दोन तीन दिवसांपासून नाणेघाट परिसरात पाऊस होत असून आज ता.१६ रोजी पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या, पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या ऐतिहासिक नाणेघाटा- जवळील ब्रिटिश कालीन फडके बंधारा तुडुंब भरून वाहू लागला आहे.