दुधेबावी :- दिव्यांगांच्या मागण्यांसाठी फलटण तहसीलसमोर आमरण उपोषण

दुधेबावी :- दिव्यांगांच्या मागण्यांसाठी फलटण तहसीलसमोर आमरण उपोषण
Published on

फलटणमध्ये प्रहार जनशक्ती संघटनेचे आंदोलन
दुधेबावी, ता. ११ : फलटण तालुक्यातील दिव्यांग, शेतकरी व शेतमजूर बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की फलटण तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात पूर्णवेळ अधिकारी नेमावा, दिव्यांग बांधवांच्या जागेसंबंधीचे प्रश्न प्रलंबित आहेत. संजय गांधी विभागातील अधिकाऱ्यावर कारवाई करावी. मे २०२५ मधील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे अनुदान अद्याप वितरित झाले नसल्याने ते तत्काळ देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सोमंथळी येथील शिवाजी कर्चे यांच्या रस्त्याची नोंद तहसीलदारांच्या आदेशानंतरही झालेली नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गाडवे, प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष महेश जगताप, उपाध्यक्ष संग्राम इंगळे व संघटक अभिषेक गुंजवटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------------------------

03186
फलटण ः येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com