

Pharmacy Direct Second-Year Admission 2026-27: Third merit list announced. 1,208 new students have been allotted seats, while 941 students have secured colleges as per their preferences. Admission confirmation is open from August 27 to 29.
Sakal
पुणे : राज्यात थेट द्वितीय वर्ष औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. यात एक हजार ४४८ विद्यार्थ्यांपैकी एक हजार २०८ नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर, ९४१ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवार (ता. २७ ) ते शनिवार (ता. २९) या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले.