लाखेवाडी विद्या निकेतनचा बायोसाइट लॅबोरेटरीशी करार

लाखेवाडी विद्या निकेतनचा 
बायोसाइट लॅबोरेटरीशी करार
Published on

वडापुरी, ता. १९ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक विकासासाठी विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडी (ता. इंदापूर) आणि बायोसाइट रिसर्च लॅबोरेटरी, सांगली यांच्यात पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांना संशोधन, प्रशिक्षण आणि उद्योगाभिमुख कौशल्य विकासाच्या संधी मिळणार आहेत.
महाविद्यालयात आयोजित करिअर मार्गदर्शन सप्ताहादरम्यान हा करार करण्यात आला. या सप्ताहात तृतीय व अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक्सप्लोरेशन ऑफ फॉर्माकॉलॉजी’ या विषयावर विशेष सत्र झाले. बायोसाइट इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक डॉ. संदीप पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना फार्माकॉलॉजी, क्लिनिकल रिसर्च आणि औषधनिर्मिती उद्योगातील संधींबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा डॉ. चित्रलेखा ढोले, प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव, सचिव हर्षवर्धन खाडे, विश्वस्त ऋषिकेश ढोले, प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर आणि शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधून करिअरच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com