
PhD Students
sakal
पुणे : गेल्या सात दिवसांपासून संशोधक शिष्यवृत्ती जाहिरातीच्या मागणीसाठी गोपाळकृष्ण गोखले चौकात सुरू असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांच्या (पीएच.डी.) आंदोलनाला शेवटी यश आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या मागण्यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.