भाजपमध्ये प्रवेश केला अन् काँग्रेस भवनातील फोटो गेला!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा भाजपप्रवेश मुंबईत झाल्यानंतर पुण्यातील काँग्रेस भवनात असलेला त्यांचा फोटो कार्यकर्त्यांनी तातडीने हटवला.

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या भाजपप्रवेशानंतर पुण्यातील काँग्रेस भवन येथे महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा फोटो काढून टाकला. याबाबत काँग्रेसच्या एका युवक कार्यकर्त्याने स्वतःच्या फेसबुक वॉलवर हा फोटो पोस्ट करत 'काँग्रेस भवन' एवढीच प्रतिक्रिया दिली आहे.

आठवले म्हणतात, 'सत्ता हवीये तर माझ्याकडे या'

राज्यातील काँग्रेसचे बडे नेते असा लौकिक असणारे हर्षवर्धन पाटील यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Photo of Harshavardhan Patil have been Removed from Pune Congress Bhavan