पुण्यातील कचरा प्रश्न पेटला ?

ज्ञानेश सांवत
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

फुरसुंगी : डेपोत कचरा टाकू न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहून उरळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा वाहतूक करणारी वाहने रोखली. मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने सांगून ग्रामस्थ आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे डेपोपर्यंत कचरा पोचू शकला. आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याचा परिणाम होत नसल्याचे महापालिका प्रशासनाने बुधवारी सांगितले. 

दरम्यान, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात झालेल्या दुसऱ्या बैठकीतही सकारात्मक मार्ग निघालेला नाही. मात्र, सर्व भागातील कचरा उचलण्यात आला आहे. तो नियमित उचलला जाईल, असे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन देऊनही कचरा टाकणे बंद होत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. तरीही, ग्रामस्थ माघार घेत नाहीत. "सतत मागण्या मांडत आहोत. मात्र, त्यांचा विचार झालेला नाही. केवळ चर्चा करून समजूत काढण्यात येते. त्यामुळे आंदोलन मागे घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

जगताप म्हणाले, ""दोन्ही गावांत पायाभूत सुविधा पुरविल्या आहेत. नव्या मागण्यांनुसार त्यांची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. परंतु, काही निर्णय राज्य सरकारच्या पातळीवर अपेक्षित आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या काळात कचरा उचलण्यात येईल. ग्रामस्थांनी पुन्हा चर्चा करू.'' 

Web Title: Phrusungi garbage issue question