उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकून पिकप एक ठार तीन जखमी

उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकून पिकप एक ठार तीन जखमी
Published on: 

उसाच्या ट्रॉलीला धडकून
पिकअप उलटला; तिघे गंभीर
पांडे रस्त्यावरील सरपंच ढाब्यासमोर अपघात
सकाळ वृत्तसेवा
पांडे, ता. २४ : करमाळा शहराच्या पूर्वेकडील पांडे रस्त्यावर सरपंच ढाब्यासमोरील गतिरोधकाजवळ उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडकून पिकअप उलटला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले, तर अन्य तिघे बालंबाल बचावले. पिकअप समोरून येणाऱ्या कारला घासून गेल्याने कारमधील प्रवासीही थोडक्यात बचावले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील खेड (राशीन) येथील जाधव कुटुंब माढा तालुक्यातील ढवळस येथील अंबाबाई यात्रेत स्टेशनरीचा स्टॉल लावण्यासाठी पिकअप (एमएच ४२ एक्यू ४९९६) मधून निघाले होते. पांडे रस्त्यावरील सरपंच ढाब्यासमोरील गतिरोधकाजवळ पुढे चाललेल्या उसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करताना पिकअप ट्रॉलीच्या डांबाला धडकला. त्यानंतर तो रस्त्याच्या उजव्या बाजूला उलटला.
या अपघातात लक्ष्मी तात्या जाधव (वय ४०), कल्याणी मोतीराम जाधव (वय १४) आणि अक्षय तात्या जाधव (वय ८) हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. कल्याणीला गंभीर दुखापत झाली असून, अक्षयच्या डोक्याला आणि लक्ष्मी यांच्या हाताला जखम झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिकअपचालक रामा लक्ष्मण जाधव (वय ५२), त्यांची पत्नी बायजा रामा जाधव (वय ४०) आणि साक्षी तात्या जाधव (वय ११) यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक चंद्रकांत गोरे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली.
या अपघातातून पिकअप चालक रामा जाधव, त्यांची पत्नी बायजा आणि साक्षी जाधव हे बालंबाल बचावले असून, त्यांना कोणतीही जखम झालेली नाही. मात्र ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना उलटलेला पिकअप समोरून येणाऱ्या कारला केवळ घासून गेल्याने या कारमधील प्रवासीही थोडक्यात बचावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com