पवारवाडी पाटी, तरडोलीत पिकअप शेडची मागणी

पवारवाडी पाटी, तरडोलीत 
पिकअप शेडची मागणी
Published on

मोरगाव, ता. २६ : बारामती-मोरगाव रस्त्यावरील पवारवाडी पाटी, तरडोली आणि शेरे वस्ती येथे पिकअप शेड नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी तातडीने निवारा शेड उभारावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या मार्गाचे रुंदीकरण झाल्याने वाहतूक वाढली आहे, मात्र प्रवाशांना उन्हात आणि पावसात रस्त्यावर उभे राहून एसटीची प्रतीक्षा करावी लागते. विशेषतः पवारवाडी पाटी हा अपघातांचा ''हॉटस्पॉट'' बनला असून, येथे प्रवाशांना जीव धोक्यात घालून थांबावे लागते. एसटी महामंडळ, सामाजिक संस्था किंवा उद्योजकांनी सीएसआर फंडातून येथे प्राधान्याने शेड उभारावे, अशी मागणी होत आहे.
बारामती पंचायत समितीच्या माजी सभापती अमृता गारडे, तरडोलीच्या माजी सरपंच विद्या भापकर, गोरख मेमाणे, संतोष चौधरी, निलेश पवार व बाबा पवार यांनी येथे पिकअप शेडची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com