PIFF : संगीतात प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा : इनॉक डॅनियल्स

‘न शिकलेला व्यक्ती देखील संगीत चूक आहे की बरोबर हे ओळखू शकतो. त्यामुळे आपणच आपले जज असले पाहिले आणि त्यानंतरच प्रेक्षकांसमोर आपली कला सादर केली पाहिजे.
inok daniels
inok danielssakal
Summary

‘न शिकलेला व्यक्ती देखील संगीत चूक आहे की बरोबर हे ओळखू शकतो. त्यामुळे आपणच आपले जज असले पाहिले आणि त्यानंतरच प्रेक्षकांसमोर आपली कला सादर केली पाहिजे.

पुणे - ‘न शिकलेला व्यक्ती देखील संगीत चूक आहे की बरोबर हे ओळखू शकतो. त्यामुळे आपणच आपले जज असले पाहिले आणि त्यानंतरच प्रेक्षकांसमोर आपली कला सादर केली पाहिजे. अन्यथा तुमच्या चुका तुम्हाला मोठे होऊ देत नाही. त्यासाठीच संगीतात प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे’ असे मत ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स यांनी व्यक्त केले.

‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि ‘महाराष्ट्र शासन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘२१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चा उद्घाटन सोहळा मुकुंदनगर येथील थिएटर अकादमीच्या सकल ललित कलाघरात गुरुवारी (ता.२) पार पडला. त्यावेळी डॅनियल्स बोलत होते. नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, कलात्मक संचालक समर नखाते, फाउंडेशनचे कोषाध्यक्ष राजेंद्र केळशीकर आणि फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे आदी उपस्थित होते.

या सोहळ्यात गायिका उषा मंगेशकर यांना चित्रपट संगीतातील योगदानासाठी ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ पुरस्काराने तर ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार आणि डॅनियल्स यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू इंडियन सिनेमा’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

मनोजकुमार यांना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुंबई त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी महोत्सवाच्या कॅटलॉगचे अनावरण करण्यात आले. तसेच फिल्म एडिटर ए श्रीकरप्रसाद आणि पोलंड येथील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक ख्रिस्तोफर झानुसी यांचा यावेळी डॉ. आगाशे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. जब्बार पटेल यांनी महोत्सवाची माहिती दिली. ऋतुजा इंगळे आणि अंगत पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.

‘जैत रे जैत’ चित्रपटांच्या आठवणींना उजाळा -

मंगेशकर यांनी पुरस्कार स्वीकारताना डॉ. पटेल यांच्यासोबत काम केलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटांबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. पुरस्कार दिल्याबद्दल आभार आणि माझे नाव सुचविणाऱ्यांचे अभिनंदन, असे मंगेशकर म्हणाल्या. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, गायिका प्रियांका बर्वे यांनी आपल्या सहकलाकारांसह गायन सादर केले. तर नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी सहकलाकारांसोबत नृत्य सादर केले.

महोत्सवातील परिक्षक -

डॉमनिक लोचर, कीम डोंग होंग, केरी बशेरा, पी शेषाद्री, स्टिग जोर्कमन, जॅकलीन लेंसाव, महेश नारायणन, मरिता हेल्फर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com