पिलीव केंद्र शाळेत चिमुकल्यांनी भरवला आठवडा बाजार
PIL26B00898
पिलीव (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळावा आठवडी बाजार भरवला होता.
पिलीव जि.प. शाळेत बालआनंद बाजार
पिलीव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे चिमुकल्यांनी बालआनंद मेळावा आठवडा बाजार भरवून खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला. विद्यार्थी विक्रेते बनून भाजीपाला, कडधान्ये आणि खाद्यपदार्थ स्टॉलवर विक्री करत होते. पालक व ग्रामस्थांनी या अनोख्या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिमुकल्यांच्या आठवडा बाजार मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक उपस्थित होते. बालवयातच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, पैशांचे व्यवहार, मोजमाप आणि भाजीपाल्याची ओळख व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

