गटार, पदपथ खचल्याने अपघाताचा धोका
पिंपळे सौदागर, ता. ३१ ः पिंपळे सौदागर परिसरातील साई ऑर्चिड सोसायटी समोरील बीआरटी मार्गालगतचा पदपथ मोठ्या प्रमाणात खचल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथालगत असलेले गटाराचे झाकणही खचल्यामुळे इथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पादचाऱ्यांना धोका पत्करुन ये-जा करावी लागत आहे.
पदपथ अचानक खचल्याने मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्याजवळ कोणतेही सुरक्षात्मक फलक, बॅरिकेड्स किंवा इशारा देणारी व्यवस्था नसल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी अपुरा प्रकाश असल्याने एखाद्या पादचाऱ्याचा पाय खचलेल्या भागात गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून खचलेला पदपथ व गटाराच्या झाकणाची दुरुस्ती करावी. तोपर्यंत आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था, बॅरिकेड्स व इशारा फलक उभारावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या ठिकाणची तातडीने पाहणी करण्यात येईल. खचलेले गटार व पदपथामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी लगेचच आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील.
- चंद्रकांत मोरे, उपअभियंता, दळणवळण विभाग
खचलेले गटाराचे झाकण व पदपथामुळे दररोज ये-जा करताना अपघाताची भीती वाटते. प्रशासनाने तातडीने पाहणी करून उपाययोजना करावी. लवकरात लवकर दुरुस्ती झाली, तर नागरिकांना दिलासा मिळेल.
- चंदन चौरसिया, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

