खुटबाव - जळण म्हणून प्लास्टिक व चपला वापरणारी, तसेच गुळाचे वजन वाढावे म्हणून चॉकलेट, साखर यांचा भेसळ म्हणून वापर करणारी पुणे जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळघरे वर्षभर प्रशासनाच्या रडारवर असतात. या पार्श्वभूमीवर गेली ३ दशके काळानुरूप बदल करत पिंपळगाव (ता. दौंड) येथील बापूराव नातू या शेतकऱ्याने पारंपरिक व रसायन विरहित गूळ तयार करणारे प्रदूषण विरहित गुऱ्हाळ कौतुकास पात्र ठरत आहे. येथील गुळाला परदेशात मागणीही मागणी होत आहे.