पिंपळगाव खडकीत दुसरा बिबट्या जेरबंद

पिंपळगाव खडकीत दुसरा बिबट्या जेरबंद

Published on

मंचर, ता. ७ : पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) गावच्या कार्यक्षेत्रातील लिंबाचामळा परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दोन दिवसात शनिवारी (ता. ७) दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला. या भागात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याची शेतकऱ्यांची तक्रार असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लिंबाचामळा परिसरात एकाच वेळी चार बिबटे फिरताना दिसल्याची माहिती शेतकरी योगेश बांगर यांनी वन विभागाला दिली होती. त्यानंतर मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी तातडीने त्या परिसरात पिंजरा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वन विभागाने बबन अहिलू बांगर यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बुधवारी (ता. ४) रात्री एक बिबट्या जेरबंद झाला होता. त्याच ठिकाणी पुन्हा शनिवारी सकाळी दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनपाल सोनल भालेराव यांनी दिली. वनरक्षक संपत तांदळे, वनसेवक जालिंदर थोरात आणि किसन पोखरकर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला ताब्यात घेतले. जेरबंद झालेला बिबट्या मादी असून, तिचे वय साडेतीन वर्षे आहे. तिची वैद्यकीय तपासणी करून माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात येणार आहे.
दरम्यान, या परिसरात चार बिबटे एकत्र फिरताना दिसल्याने त्यापैकी दोन बिबटे पकडले असले तरी उर्वरित दोन बिबटे परिसरात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्याच ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

15365

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com