

Justice for the 10-year-old girl: Thousands join silent march in Pimpalwandi, demand fast-track trial and strictest punishment for the accused.
Sakal
पिंपळवंडी : येथील अल्पवयीन १० वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या व हत्येच्या निषेधार्थ पिंपळवंडी येथे गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या मुकमोर्चा आणि शोकसभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर त्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि नराधमाचा धिक्कार करणाऱ्या भावनांनी सुन्न झाला होता. या वेळी संतप्त ग्रामस्थांनी व विविध संघटनांनी गावातून मोर्चा काढत आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.