Junnar Protest: पिंपळवंडीतील दहा वर्षीय मुलीवरील अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जुन्नरमध्ये महिलांचा मूक मोर्चा

पिंपळवंडीतील दहा वर्षीय मुलीवरील अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जुन्नरमध्ये तनिष्का गट व तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानतर्फे महिलांचा मूक मोर्चा, आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टातून फाशीची मागणी
Tanishka Group chief Dr. Ujwala Shewale submitting a memorandum protesting the Pimpalwandi incident, in the presence of a large number of women.

Tanishka Group chief Dr. Ujwala Shewale submitting a memorandum protesting the Pimpalwandi incident, in the presence of a large number of women.

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षीय मुलीवर अमानूष अत्याचार करत तिच्या केलेल्या दुर्दैवी हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ जुन्नर शहरात तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ तनिष्का गटाच्या प्रमुख डॉ. उज्वला शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली तनिष्का गट व तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने महिलांचा मूक मोर्चा काढण्यात आला. तुळजाभवानी हॉस्पिटल, शंकरपुरा पेठ मार्गे तहसील कार्यालय असा शांततेच्या मार्गाने काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीनशेहून अधिक महिलांनी भाग घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com