
पिंपळवंडी - पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे सोमवारी (ता. २) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रकची दुचाकीस्वाराला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला. रामदास रघुनाथ कुतळ (राहणार-नगदवाडी, ता. जुन्नर, वय-६८) हे या अपघातात मृत्युमुखी पडले.