

Five Months After Foundation Stone, Work Yet to Begin
Sakal
निरगुडसर : भूमिपूजन होऊन पाच महिने झाले तरी अद्याप रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना,वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-निरगुडसर रस्त्याच्या कामासाठी साडेसहा कोटी रुपये निधी मिळाला परंतु रस्त्याचे काम काही सुरू होईना.पिंपळगाव ते निरगुडसर (ता.आंबेगाव) या सहा किमी रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रवास करणे म्हणजे एक प्रकारची कसरत बनली होती,याबाबत दैनिक सकाळ मध्ये वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खडी,डांबर टाकून खड्डे बुजवले आहेत,परंतु त्याला देखील दीड महिना उलटला आता पुन्हा रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने प्रवाशांचा प्रवास पुन्हा खडतर झाला आहे.