पिंपळगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे

पिंपळगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे
Published on

राहू, ता. ६ : पिंपळगाव (ता. दौंड) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश रामभाऊ शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी योगिता अनिल फरगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव गणेश पाडळे व सहसचिव नीलेश थोरात यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा पिंपळगाव विकास संस्थेच्या अनेक सभासदांना लाभ झाला असून संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.
यावेळी सतीश थोरात, राजेंद्र शितोळे, दीपक कापरे, रमेश अवाळे, विशाल चव्हाण, तात्यासाहेब ठोंबरे, सचिव गणेश पाडळे, सहसचिव नीलेश सुतार यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. पिंपळगाव सोसायटी ही परिसरात अग्रगण्य सोसायटी म्हणून नावारूपाला आलेली आहे.

03923, 03924

03923, 03924

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com