esakal | Pimpri | पवना जलवाहिनीचे सर्व पाइप गोळा करणार
sakal

बोलून बातमी शोधा

पाइप

पिंपरी : पवना जलवाहिनीचे सर्व पाइप गोळा करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पवना जलवाहिनीचे काम गेल्या दहा वर्षांपासून बंद आहे. मात्र, त्यासाठी आणलेले पाइप अनेक ठिकाणी पडून आहेत. त्यापोटी भूभाडे महापालिका संबंधितांना देत आहे. त्यामुळे आता सर्व पाइप गोळा करून रावेत येथे आणले जाणार आहेत. त्यासाठी तब्बल १३४ कोटी ६७ लाख रुपये खर्च येणार आहे. हा निधी कार्यकारी अभियंताद्वारा निर्मिती विभागाकडे जमा करण्याच्या प्रस्ताव स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. मात्र, गेल्या वर्षाच प्रशासनाने पाइप स्थलांतरीत करण्यास दिरंगाई केली, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिका स्थायी समिती सभा नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात विविध विकास कामांसाठी येणाऱ्या १२ कोटी १४ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. संचलन तुटीपोटी पीएमपीला १२ कोटी रुपये दिले जाणार आहेत. कचरा संकलन व विलगीकरणासाठी १९ कोटी २० लाख रुपये खर्च येणार आहे. मूळचे पिंपरी-चिंचवड महानगर परिवहन (पीसीएमटी) सेवेतील पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान देण्यासही मंजुरी दिली.

हेही वाचा: वर्धा : बयानाच्या भीतीने केला वसंताचा गेम; मास्टर माइंडसह तिघांना अटक

दरम्यान, पवना जलवाहिनीला विरोध झाल्याने दहा वर्षांपासून काम बंद आहे. त्यासाठी आणलेले पाइप कामशेत, कान्हे फाटा, वडगाव, ब्राह्मणवाडी, किवळे, गहुंजे आदी ठिकाणी पडून आहेत. ते गोळा करून रावेत येथे आणण्यात येणार आहेत. त्यासाठीची यंत्रणा दापोडी येथील जलसंपदा विभागाकडे आहे. त्यांच्या मार्फत पाइप गोळा केले जाणार आहेत. त्याबाबतचा खर्च जमा करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

वापरणार कुठे?

पवना जलवाहिनीसाठीचे पाइप दहा वर्षांपासून पडून होते. आता ते गोळा केले जाणार आहेत. पवना वाहिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी आणण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ‘पवने’चे पाइप वापरणार का? याबाबत प्रशासनाचे काहीही नियोजन नाही. त्यामुळे ‘पवने’चे पाइप वापरणार की ते आणखी पडून राहणार याबाबत अनभिज्ञता आहे.

loading image
go to top